गुंगीचं औषध पाजलं, विवाहितेवर केला अत्याचार, नाशिकच्या कॅप्टन खरातकडे कोट्यवधींचं घबाडही घावलं, नेमकं काय घडलं?

नाशिक : नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातला मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, आरोपी खरात हा मागील दोन वर्षांपासून पीडित विवाहित महिलेचं लैंगिक शोषण करत होता. अनेकदा तिला भेटून नको त्या गोष्टींची मागणी करत होता. तुझ्या पतीचा मृत्यू होईल, अशी भीती घालून कॅप्टन खरात महिलेवर अत्याचार करत होता. यामुळे अनेकदा त्यांच्यात चुकीच्या गोष्टी देखील घडल्या.
नंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी त्याला कर्मयोगी नगरमधील बंगल्यातून अटक केली. यानंतर आता पुढील तपास सुरू आहे. आता पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील एका पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाले आहेत.

यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एकनाथ शिंदेंचे देखील भविष्य सांगितले होते. काही दिवसांपूर्वी त्याने एकनाथ शिंदेंचे देखील भविष्य सांगितले होते. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला.
न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगत होता. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून अनेकांचे फोटो व्हायरल देखील झाले आहेत. याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.