पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात ! कांचनगंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकून पाच ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ..!!


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त आहे. सियालदहहून आगरतळाला जाणारी कांचनजंगा एक्स्प्रेस सिलीगुडीमध्ये मालगाडीला धडकली.या दुर्घटनेतील आतापर्यंत ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर २५ ते ३० जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, मृतंच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सुमारे ३ बोगी रुळावरून घसरून इंजिनवर चढल्या आहेत.रेल्वे प्रशासनाव्यतिरिक्त स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दल मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

दरम्यान, दार्जिलिंगचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिषेक रॉय यांनी सांगितले की, आतापर्यंत २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याने सांगितले की मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली.

घटनेच्या वेळी दार्जिलिंगमधील रंगपानी आणि निजबारी स्थानकांदरम्यान कांचनजंगा एक्सप्रेस उभी होती.अपघातांच्या कारणांची माहिती समोर आलेली नाही. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. असे आशुतोत रॉय यांनी सांगितले. दरम्यान, अपघाताची माहिती देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत डॉक्टरांची एक टीम घटनास्थळी रवाना झाली असल्याचे सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!