कतरिना कैफ-विकी कौशलच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. कतरिनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

कतरिना आणि विकीवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. छोट्या छावाच्या दमदार एन्ट्रीने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी कतरिना आई झाली आहे.

कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. कतरिना कधी गुड-न्यूज देणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर 7 नोव्हेंबर 2025 रोजी तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आमच्या आयुष्यात आनंदी आनंद आलाय, असं पोस्टमध्ये म्हटलंय. विक्की-कतरिनाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यानं लिहिलंय की, “आमच्या आनंदाचं आगमन झालंय… अपार प्रेम आणि कृतज्ञतेनं, आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतोय… 7 नोव्हेंबर 2025… कतरिना आणि विक्की…”
कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या. अखेर काही दिवसांपूर्वी कतरिनानं आपली प्रेग्नंसी अनाउंस केलेली आणि त्यासोबत वेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा विक्कीसोबतचा एक फोटो शेअर केलेला. या जोडप्यानं सप्टेंबरमध्ये घोषणा केलेली की, ते त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करणार आहेत.
