80 वर्षांच्या तरूणीचा सध्याच्या तरुणांना लाजवेल असा प्रवास! आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, पुण्यातील व्हिडिओ व्हायरल…


पुणे : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अनेक वेळा प्रेरणा मिळते. तसेच त्या व्हिडीओ पाहून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये साधारण ८० वर्षांच्या आजी सायकल चालवताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ पुणे शहरातील वारजे परिसरात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये आजीबाई सायकल चालवत कुठेतरी जात आहेत.

“८० वर्षांची ‘तरुणी’ आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते पण चेहऱ्यावर मात्र कायमस्वरूपी स्मितहास्य असले पाहिजे. या वाक्यांना साजेसं असं उदाहरण… पुण्यातल्या वारजेतील या आजी! असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान हा व्हिडिओ दुचाकीवरून शूट करण्यात आला असून दुचाकीस्वार या आजीसोबत गप्पा मारताना यामध्ये दिसत आहेत. सध्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

वयाच्या या टप्प्यावरही या आजीबाईला सायकलवर प्रवास करावा लागत आहे, अशा भावनिक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर परिस्थिती कायम राहत नाही, ती सारखी बदलत असते त्यामुळे काळानुसार स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे असते, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हरायल होत असून पुणेकर या व्हिडीओला भरभरून प्रेम देत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!