पुण्यात अग्नितांडव! टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या गोदामाला लागली भीषण आग..
पुणे : पुण्यातून आग लागल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पहाटे पुण्यातील टिंबर मार्केट, रामोशी गेटनजीक लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.
यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत १० सिलेंडर बाहेर काढले ज्यामुळे आग शेजारील वस्तीमध्ये आणि शाळेमध्ये पसरू शकली नाही. एकुण १८ अग्निशमन वाहने याठिकाणी दाखल झाली होती.
दरम्यान, येथील चार घरांना देखील या आगीची झळ सोसावी लागली. २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणे कॅन्टोमेंट पीएमआरडीए पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर दाखल झाले होते.
Views:
[jp_post_view]