तरुणांना मोठी संधी! पुणे महापालिकेअंतर्गत ५८१ पदांसाठी भरती, जाणून घ्या..
पुणे : तरुणांना सध्या एक मोठी संधी चालून आली आहे. पुणे महानगरपालिकेत जवळपास 581 पदांसाठी भरती होणार आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
प्राथमिक शिक्षक, शिपाई आणि इतर पदांसह 581 पदांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट – https://pmc.gov.in/ वर ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम, 260 जागा, माध्यमिक शिक्षक 110, उच्च माध्यमिक शिक्षक 21, अर्धवेळ शिक्षक 133, मुख्याध्यापक 1, पर्यवेक्षक- 1, माध्यमिक शिक्षक 35, माध्यमिक शिक्षक प्राथमिक 5, कनिष्ठ लिपिक 2, पूर्णवेळ ग्रंथपाल 1, प्रयोगशाळा सहाय्यक संगणक प्रयोगशाळा -1, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा 1, शिपाई 10 जागा.
निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत असेल. लेखी परीक्षा 25 जून 2023 रोजी होणार आहे. मुलाखत 15 जुलै 2023 रोजी होणार आहे.
यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://pmc.gov.in/mr/?main=true
अधिकृत अधिसूचना – http://surl.li/hxrsx
अधिक माहितीसाठी – https://pmc.gov.in/ माहिती मिळेल.