महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! दोन महिन्यांचे हप्ते मिळणार एकत्र, मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या ७ हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे.

फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. मार्च महिना उजाडला तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. महिला दिनानिमित्त ८ मार्चला राज्यातील लाडक्या बहिणींना राज्यसरकारकडून खास गिफ्ट देण्यात येणार आहे.

लाडकी बहिण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे एकत्र हप्ते म्हणजेच ३ हजार रूपये मिळणार आहेत. सोमवारी विधीमंडळ परिसरात मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली.

लाडकी बहिण योजनेवरून विरोधक सुरूवातीपासून आरोप करतच आले आहेत. गेल्या महिन्यात जवळपास २ कोटी ४० लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यातही तसाच लाभ मिळणार आहे. विरोधकांना ही योजना खुपते. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांमध्ये नैराश्य पसरले आहे.

पण कोणत्याही परिस्थीतीत ही योजना सुरू राहणार आहे. ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!