पुणे हादरले! पैशाच्या वादातून मित्रानेच काढला मित्राचा काटा, डोक्यात सिलेंडर घालून हत्या..


पुणे : पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात गॅस सिलेंडर मार खून केल्याची घटना पुण्याच्या वाघोली परिसरत उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शैलेश रमेश मांडगीकर (वय. २५) असे हत्या झालेल्या मृत तरुणाचे नाव आहे. तर, श्रीराम गोपाळ कोटलापुरे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शैलेश मांडगीकर आणि श्रीराम गोपाळ हे दोघे मित्र होते. चार दिवसाच्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून त्यांच्यात वाद झाला.

त्यानंतर पैशावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने डोक्यात गॅस सिलेंडर मारुन शैलेश मांडगीकर याला जखमी केले. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!