तीर्थक्षेत्र रामदरा डोंगर परिसरात वनवा पेटल्यामुळे लाखो झाडांबरोबर छोटे कीटक, सरपटणारे प्राणी व पशुपक्षांना फटका…


लोणी काळभोर : येथील तीर्थक्षेत्र रामदारा परिसरामध्ये असलेल्या वनविभागाच्या हद्दीतील डोंगरावर काल दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या वनव्यामुळे लाखो झाडांबरोबर छोटे कीटक, सरपटणारे प्राणी व पशुपक्षांना याचा फटका बसला आहे.

वनव्याची माहिती मिळताच ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांचे समवेत फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. त्यांनी पोती व झाडांच्या फांद्या यांचे सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतू आगीला वा-याची साथ मिळाल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. यांमुळे या डोंगर परिसरातील खैर, करवंद, कडुनिंब, चंदन, टंटणी, वेगवेगळ्या प्रजातीच्या बाभळी यांचेसमवेत अनेक झाडांना याची झळ पोहोचली.

याचबरोबर या परिसरात आढळून येत असलेल्या मोर, ससा, हरीण, कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, मुंगुस, रानडुक्कर, साप छोटे छोटे कीटकनाशक, सरपटणारे प्राणी आदी पशुपक्षांनाही याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.
त्याचप्रमाणे ग्रीन फाउंडेशनच्या वतीने झाडांना पाणी देण्यासाठी करण्यात आलेली पाईपलाईन जळून खाक झाली आहे .

वनवा लागला का लावला? याचा तपास अद्यापही लागला नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी प्राणी यांचे बळी गेले आहेत याचे गांभीर्य घेऊन वनविभाग कोणते पाऊल उचलणार? यावर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यामध्ये डोंगराला वनवा लागतो यामध्ये पक्ष्यांची अंडी, प्राण्यांची पिल्लांचे बळी जातात. तसेच मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होते याला कारणीभूत कोण? असा सवाल ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केला आहे.

या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ कार्यकर्ते आगीशी झुंज देताना दिसत होते. वन कार्यालयातील कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी या परिसरात फिरकला नसल्याचे निदर्शनास आले. वनखात्याच्या वतीने झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतू मोठी झाडे जळत असताना त्यांना वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही ही शोकांतिका असल्याचे मत परिसरातील एका जेष्ठ नागरिकाने व्यक्त केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!