मैत्री करून जबरदस्ती संबंध ठेवले, अल्पवयीन राहिली गर्भवती, बाळाला जन्म देताच भयंकर माहिती आली समोर…

सांगली : जत तालुक्यातील काराजनगी गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली आणि जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी पीडित मुलीने स्वतः जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहदेव उर्फ प्रशांत गायकवाड (रा. काराजनगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काराजनगी येथील सहदेव गायकवाड याने गेल्या एक वर्षांपासून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली. याच मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती गर्भवती राहिली.
दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीने स्वतः जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणावर पोलिसांनी बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 (POCSO) च्या कलम 6, 4 आणि 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे.