ब्रेकअप झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या डॉक्टरने मर्सिडीज बंद करुन लावली आग…!
पुणे : आपल्या रागावर नियंत्रण नसेल काहीही होऊ शकते. याची अनेक उदाहरणे आहेत. आता चेन्नईतील डॉक्टराने जे केले ते इतरांना धडा देणारे आहे. चेन्नईमधील २९ वर्षीय डॉक्टर कवीन याने मागील वर्षीच एका खाजगी महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करु लागला.
काव्या ही या डॉक्टरची मैत्रीण होती. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोन दिवसांपुर्वी कविनने काव्याला सोबत घेतले. दोघं ५० लाखांच्या मर्सिडीज बेंझ कारमधून लाँग ड्राइव्हला गेले. मात्र सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मात्र काही तरी बिनसले.
कांजीपूरम जिल्ह्यातील राजाकुलम तलावाजवळील निर्जन भागात ते गप्पा मारत बसले. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. काही कारणांवरुन काव्या-कवीनमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात ब्रेकअप झाले. यामुळे त्याला खूप राग आला.
त्याचदरम्यान तो त्याच्या मर्सिडीज बेंझ कारमध्ये बसला आणि गाडीला आग लावली. परंतु तो बाहेर पडला. थोड्या वेळात मर्सिडीजची राख रांगोळी झाली. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.