सातारा डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळ वळण ; राज्यातील मोठ्या नेत्याला संपदाच्या मैत्रिणीचा फोन, केला धक्कादायक खुलासा….


सातारा : फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संपदा मुंडे यांच्या मैत्रिणीने थेट एका बड्या नेत्याला फोन लावली असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी संपदाच्या मैत्रिणीने मला फोन केला आणि बरंच काही सांगितले आहे पण मी त्या मुलीची माहिती देणार नाही कारण तिच्या जीवाला धोका आहे. असं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखीन काय वेगळं वळण लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मेहबूब शेख पुढे बोलताना म्हणाले की, संपदा यांचा फोन 11.37 ला सीन कसा झाला. राजश्री रायगुडे नावाची ह्या महिलेने मला फोन केला आणि मला धमकावले आहे. तुम्ही फलटनला या मग मी दाखवते. फलटन हा काय केंद्रशासित प्रदेश आहे का? संपदाने काय केले असेल देव जाणे. भाजपचा सरचिटणीसाने खून केलाय. त्यांच्या हाताची बोटं तोडली डोक्यात्या चिंध्या चिंध्या केल्या आहे. तो का सापडत नाही.आज मला एक माहिती मिळाली की, बदने यांची चाैकशी करण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. बदनेच्या चौकशीसाठी चांगला अधिकारी मिळाला नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान याप्रकरणी तुम्ही संवेदनशील असाल तर एसआयटी चौकशी करा. त्या हॅाटेलचे मालक हे निंबाळकर यांचेही कार्यकर्ते आहेत. महिला डॉक्टरचा मृतदेह कुंटुबातील कोणी असताना का खाली आणला. दोन लोकांनी आत्महत्या केली. उगाच कोणी आत्महत्या करत नाही. असंही मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!