नाताळच्या एक दिवस आधी सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, दरवाढीचे महत्त्वाचं कारण आलं समोर..

मुंबई : सोने चांदीच्या दराबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. फेडच्या धोरणात्मक दराच्या घोषणेनंतर डॉलर निर्देशांकात घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यानंतर सोन्याचा भाव 79 हजार रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच चांदीचा भाव 90 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

डॉलरचा निर्देशांक जसजसा खाली येईल तसतसे सोन्याच्या किमतीतही वाढ होईल, असे अनेकांनी सांगितले आहे. तसेच युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या भावालाही पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. यामुळे तीन दिवसांच्या घसरणीनंतर आणि ख्रिसमसच्या दोन दिवस आधी, दिल्लीत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
गेल्या ट्रेडिंग सत्रात पांढरा धातू 88,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. लग्नसराईच्या हंगामासाठी स्टॉकिस्ट आणि ज्वेलर्स यांनी केलेल्या मूल्य खरेदीमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याची तेजी काही दिवस अशीच राहील.

दरम्यान, दिल्लीत काल सोन्याचा भाव 570 रुपयांनी वाढून 78,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी हा दर 78,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही सोमवारी 570 रुपयांनी वाढून 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. यामध्ये लग्न सराईमुळे बदल होताना दिसत आहे.
दरम्यान, शुक्रवारी शेवटच्या सत्रात तो 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 1,850 रुपयांनी वाढून 90,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दरम्यान, आगामी काळात देखील या दरात तेजी राहील. यामुळे नवीन वर्षात देखील हा आलेख वाढणारच असल्याचे सांगितले जात आहे.