कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं धक्कादायक कारण

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या आश्रुबा कांबळेचा जीव साई कला केंद्रातील नर्तकीवर जडला होता.
तीन दिवस सोबत देवदर्शन आणि पर्यटन करून आल्यानंतर तरुणानं टोकाचं पाऊल का उचललं, याचे कारण आता समोर आलं आहे.
आश्रुबा आणि पूजा वाघमारे यांच्यातील पैशांच्या कारणावरूनही सतत भांडण होत होते. पूजाकडून वारंवार फोन करून साई कला केंद्रात बोलावणे आणि पैशांची मागणी सुरूच होती. या दबावामुळे आश्रुबाने घरातील सोने गहाण ठेवले आणि पोस्टातील आरडीदेखील मोडली. तरीही पैशांची मागणी सुरूच राहिल्याने आणि पत्नी घर सोडून गेल्यानंतर वाढलेल्या मानसिक ताणामुळे आश्रुबाने अखेर गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं असल्याची समोर आली आहे.
आश्रुबा येडशीजवळील यशोदा स्टोन क्रशरवर मजूर म्हणून काम करत होता. क्रशरपासून काही अंतरावर असलेल्या साई कला केंद्रात नर्तकी पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते. पूजा वारंवार आश्रुबाच्या घरी येत असायची, यामुळे आश्रुबा आणि त्याची पत्नी साक्षी यांच्यात वाद वाढत गेले. अखेर या धकाधकीला कंटाळून साक्षी माहेरी पुणे येथे गेली. त्यानंतर पूजा आणि अश्रुबा यांच्यातील संबंध वाढत गेले. पैशाच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. अखेर त्यांन आपल आयुष्य संपवलं.

या प्रकरणी आश्रुबाच्या चुलत भावाने, भारत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूजाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. घटनेच्या पहाटेच पूजाने आश्रुबाच्या बहीण छबुबाई यांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली होती.

