धक्कादायक ! निर्दयी बापाने गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसूती ! समाजात बदनामीच्या भीतीपोटी जन्मलेल्या बाळाचे शिर केले धडावेगळे…!


सातारा : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खाेऱ्यात अत्याचारानंतर गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून निर्दयी बापाने जन्मलेल्या बाळाचे शिर धडावेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या बापावर ढेबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी खोऱ्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. त्यातून ती साडेआठ महिन्यांची गर्भवती राहिली होती. याप्रकरणी एका तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या न्यायालयीन पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असता मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली. तेव्हा मुलीच्या माहितीनंतर तपास अधिकारी हादरून गेले. तिने म्हटले की, वडिलांनी घरीच प्रसूती केली आणि जन्मलेले बाळ रडल्यामुळे शेजाऱ्यांना कळेल म्हणून बाळाचे तोंड दाबून पारळीने त्याचे शिर धडावेगळे केले. समाजात बदनामीण होईल या भितीने आरोपी पित्याने हे कृत्य केले. मुलीने या घटनेचा विरोध केला असता, त्याने तिला गप्प राहण्याची धमकी दिली. मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी बापावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून तो देखील पोलिस कोठडीत आहे.

पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न 

जन्मलेल्या बाळाचा पारळीने गळा चिरल्यानंतर धडावेगळे केलेले शिर नाल्यामध्ये टाकून पीडित मुलीच्या बापाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. तसेच पीडित मुलीच्या बापाला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. पोक्सो गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि बाळाचा गळा चिरून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास ढेबेवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत चौधरी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!