पावसाने लोणावळ्याला झोडपले! पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर कोसळली दरड, पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प..


पुणे : खंडाळा घाटात मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. ही घटना रात्री सव्वा सहाच्या सुमारास घडली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच महामार्गावरील वाहतूकवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अनेकजण अडकून पडले आहेत. शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. यामध्ये अनेकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

सध्या राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरडी पडत आहेत. आता लोणावळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या तडाख्यामुळे लोणावळा, कार्ला परिसर जलमय झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर साधारण दहा ते साडेदहाच्या सुमारास ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळ तिनही लेनवरची वाहतूक ठप्प आहे. ओडोसी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे.

पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन यामुळे बंद आहेत. महामार्ग वाहतूक यंत्रणेच्या वतीने मार्गिका बदलण्याचं काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

अजूनही मुंबईकडे जाणारी वाहतूक सेवा संथ गतीने सुरु आहे. आयआरबी, देवदूत यंत्रणा आणि महामार्ग पोलीस लगेचच घटनास्थळी धाव घेत दरड हटवायला सुरुवात केली.

दरम्यान, लोणावळा धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शनिवार, रविवार याठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. यामुळे रोड फुल झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!