एक दोन गुंठ्यांची दस्तनोंदणी होणार नाही!! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…

पुणे : सध्या जमीन खरेदी विक्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात तुकडेबंदी कायदा असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्तनोंदणी करण्यात येत होती. याबाबत अनेकदा अडचणी निर्माण झाल्या होत्या.

याबाबत गैरप्रकार समोर आल्यानंतर अशा प्रकारच्या जमिनींची खरेदी-विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे ले-आऊट करून प्राधिकरणाची मंजुरी बंधनकारक करण्याचे परिपत्रक काढले होते. ते रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.

असे असताना याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामुळे निर्णयाला दोन महिन्यांची स्थगिती दिली आहे.

त्यामुळे दोन महिने तुकड्यांतील जमिनींची दस्तनोंदणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता याबाबत आदेश देण्यात आले आहे.
याबाबत मोठ्या प्रमाणावर बांधकामे वाढतील, त्यातून अनेक समस्या निर्माण होतील, असेही न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून दोन महिन्यांसाठी औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यामुळे आता तोच निर्णय लागू होणार आहे. याबाबत अनेकांनी नियम मोडून अनेक गोष्टी केल्याचे दिसून आले होते
