आचाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग, तसेच महिलेला अश्लील शिवीगाळ करत केले गैरकृत्य, लोणी काळभोरमध्ये गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : विवाह व इतर सार्व महिला मजुर यांचा पुरवठा करत असलेल्या महिला मुकादमानेआचा-यास पैसे मागीतले असता त्याने टाळाटाळ करत आणखी कामगारांची मागणी केली. त्यासाठी महिला मजुर देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन आचा-याने तिच्या मुलीचा विनयभंग केला आहे. तसेच महिलेस अश्लील शिवीगाळ स्त्री मनास लज्जा उत्पन्न होणारे कृत्य केले आहे. म्हणुन पिडीतेने आचा-याविरोधांत तक्रार दिली आहे.
याप्रकरणी २८ वर्षे वयाच्या केटर्स मुकादम महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून निलेश म्हात्रे (रा. बौध्दवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिला लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत १२ वर्षे वयाची मुलगी व ६ वर्षे वयाच्या मुलीसह राहण्यास आहेत. मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ५ मध्ये शिक्षण घेत आहे. त्यांचे पती आठ महिन्यापुर्वी मयत झाले आहेत. तेव्हापासुन त्या परिसरातील मंगल कार्यालय तसेच इतर कार्यक्रमामध्ये आचारी यांना लागणारे महिला मजुर पुरविण्याचे काम करतात. त्यांचे ओळखीचा आचारी निलेश म्हात्रे यास मागील सहा महिन्यापासुन त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी महिला मजुर यांचा पुरवठा करत होत्या. निलेश म्हात्रे मला तसेच माझ्या मुलांना ओळखतो.

त्यांनी म्हात्रे यास म्हातोबाची आळंदी व इतर ठिकाणचे जेवणांचे कार्यक्रमांसाठी वेळोवेळी १०५ महिला मजुर पुरवले होते, त्यांचे पैसे बरेच दिवस त्याने दिले नव्हते. वारंवार पैसे मागीतल्याने त्याने टप्या टप्याने पैसे दिले. त्याचेकडे आणखी १७ हजार ५०० रुपये येणे बाकी आहे. पिडीत महिलेने वारंवार त्याला पैसे मागीतले असता तो टाळाटाळ करत होता. दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी मी निलेश म्हात्रे यास आळंदी म्हातोबाची येथील कामाचे पैसे मागीतले असता त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

त्यानंतर दिनांक २१ नोव्हेंबर रोजी म्हात्रे याने फोन करुन केटरींगचे कामासाठी महिला मजुरांची मागणी केली होती. त्यावेळी तिने त्यास तुम्ही पैसे देत नाही म्हणून मी मजुर पुरवणार नाही असे सांगितले होते. याचा राग मनात धरुन त्याने शनिवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारांस पिडीतेची मुलगी शाळेतुन घरी चालत येत असताना, त्याने स्वामी समर्थ केंद्राजवळ, शनिमंदीर जवळचे रोडवर म्हात्रे याने त्याचे मोटार सायकलवर मुलीचा पाठलाग करुन, त्याची मोटार सायकल आडवी लावुन मुलीकडे हिला वाईट उद्देशाने पाहुन “मी तुझ्या सोबत वाईट करील” असे बोलुन विनयभंग केला.
त्यानंतर शनिवार (२९ नोव्हेंबर) रोजी दुपारी ४.३० वाजण्याचे सुमारांस पिडीत महिलेच्या घरासमोर येवुन “तुला काय करायचे ते कर” असे म्हणाला व अश्लील शिवीगाळ करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होणारे कृत्य केले आहे. म्हणुन तिने निलेश म्हात्रे याचेविरुध्द तक्रार दिली आहे. लोणी काळभोर पोलीसांनी लैंगिक अत्याचारा पासुन बालकांचे संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप हे करत आहेत.
