सख्ख्या भावाने केली राहत्या घरासमोरच भावाची हत्या!! कारण ठरलं शेवग्याच्या शेंगा, पुण्यातील भयंकर घटना…

पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून एका भावाने सख्ख्या भावाची हत्या केली आहे. दोन भावांमध्ये शेवग्याच्या शेंगांवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये जोरदार वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

याबाबत प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. भांडण झाल्यानंतर एका भावाने सख्ख्या भावाची हत्या केली. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात घडली आहे. यामुळे खळबळ उडाली.
घरासमोरच ही हाणामारी झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. किरकोळ कारणावरून ही हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुभाष चासकर यांनी केलेल्या बेदम हाणामारीत चंद्रकांत चासकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सुभाष चासकर हे अग्निशमन दलातील रिटायर्ड कर्मचारी होते. चंद्रकांत चासकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
घटनेनंतर चंद्रकांत चासकर यांचा मृतदेह मंचर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून घटनेने सगळेच हादरले आहेत. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.