अजितदादांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शिंदे गटाच्या बड्या नेत्याची मागणी, महायुतीत वाद उफाळणार?


पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. या जमीन व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे तो रद्द झाला आहे.

तसेच १८०० कोटी मूल्य असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे ५०० रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्या वर होत असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंनी एसआयटी नेमली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावे असलेला जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे.

या एसआयटीमध्ये ८ अधिकारी असतील अशी माहिती समोर येत आहे. ही समिती आता या सर्व प्रकरणाची चौकशी करेल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या खात्यामार्फत करण्यात येत असलेल्या चौकशीचाअहवाल एका महिन्यात समोर येणार असल्याचे सांगितले.

तर पार्थ पवार यांच्या कंपनीकडून झालेल्या जमीन गैर व्यवहारप्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण तापले आहे. उद्धव सेना, काँग्रेसने याप्रकरणात चौकशीची आणि अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. तर आता शिंदे सेनेचे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी जैन बोर्डिंग प्रकरण धसास लावल्यानंतर याप्रकरणी यंत्रणांच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.

कोंढवा जमीन व्यवहारात सगळी सिस्टीम चुकली आहे, गुन्हा दाखल झालाय मात्र पार्थ पवारांना का ठेवलेय हे कळलं नाही, जैन बोर्डिंग आणि हा जमीन व्यवहार दोन्ही कांड आहेत.या व्यवहारात पोलीस ऍकशन झाली मग जैन बोर्डिंगमध्ये कां नाही, एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असं का? असा सवाल धंगेकरांनी केला. दादाच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!