राज्याच्या राजकारणात खळबळ! ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल….


अहिल्यानगर : अहिल्यानगर येथून एक धक्कादायक बातमी समोर समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेनं ही तक्रार दाखल केली असून, आरोपी किरण काळेला पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतलं आहे. फिर्यादीत म्हटलं आहे की, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये वारंवार वाद होत होते.

याच वादातून मदत मिळावी म्हणून तिचा शहरप्रमुख किरण काळे यांच्याशी संपर्क झाला. मात्र मदतीच्या बहाण्याने किरण काळे याने 2023 ते 2024 दरम्यान आपल्या संपर्क कार्यालयात वारंवार बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत वाद होते. या वादातून मदत मिळण्याकरिता पीडिता महिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे एकमेकांच्या संपर्कात आले होते. पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शहर प्रमुख किरण काळे याने महिलेवर बलात्कार केला.

२०२३ ते २०२४ पर्यंत किरण काळे याने स्वतःच्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला. तसेच ही गोष्ट कोणाला कळली तर जीवे मारण्याची धमकी किरण काळेकडून देण्यात येत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!