ड्रिंक एन्ड ड्राइव्हची केस लागली आणि संपवले आयुष्य! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने पोलिसांवर लावले धक्कादायक आरोप…


ठाणे : भारतीय सैन्य दलात आणि पोलीस मध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने ड्रिंक एन्ड ड्राइव्हची केस लागल्यामुळे करियर संपलं या नैराश्यातून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

मनीष उतेकर असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मनीष उतेकर हा तरुण ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणार आहे. तसेच तो आर्मी भरती पोलीस भरतीसाठी परीक्षा देत होता. भारतीय सैन्यदल आणि पोलीस दलामध्ये भरती होणाची स्वप्न बघणाऱ्या या मनीषने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानं टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवर एक नोट पाठवली.

यामध्ये मनीषने सांगितले आहे की, गटारीच्या दिवशी त्याने आणि त्याच्या मित्राने मद्यपान केले होते. मद्यपान करून वाहन चालवत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात अडवले आणि त्याच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करुन कोर्टात जाण्यास सांगितले.

मात्र दोन दिवस पोलिसांची माफी मागून दंड भरतो असे सांगितले तरी त्यांनी करियर बरबाद करणार असल्याची धमकी दिली असल्याचा आरोप मनीषने नोट मध्ये केला आहे. मात्र कोर्टात गेलो तर आपलं करियर संपून जाईल या नैराश्यातून मनीष उतेकर याने आपल्या राहत्या घरात आईच्या साडीच्या साहाय्याने जीवन संपवले आहे.

मनीषने काही पोलीस कर्मचाऱ्यांची नाव लिहलेली असून त्यांनी करियर संपवण्याची धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी मनीषच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी केली आहे.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु असून चौकशी नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!