पावणे सात लाखाच्या बदल्यात 70 टक्के व्याजाचा परतावा घेऊनही धमकी देणाऱ्या सावकारासह त्याच्या साथीदारांविरोधांत गुन्हा दाखल.

लोणी काळभोर : 6 लाख 59 हजार 375 रुपयांच्या बदल्यात 10 टक्के ते 70 टक्के प्रमाणे व्याजापोटी फिर्यादी व त्याच्या पत्नीकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात बारा लाख वीस हजार रुपये आणखी रक्कम मागणा-या सावकार व त्याच्या साथीदारांविरोधांत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी दत्तात्रय आनंदा पवार (वय ४३), रा. राहींजवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जिल्हा-पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावकार शाम वामन सावंत व त्याच्या इतर २ ते ४ साथिदारांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार सन २०१९ ते २०२५ अखेरपर्यंत लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राहींजवस्ती परिसरात घडला आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांनी सन २०१९ ते २०२५ अखेरपर्यंत ६ लाख ५९ हजार ३७५ रुपयाचे बदल्यात शाम सावंत व त्यांचे इतर २ ते ४ लोकांना वेळोवेळी १० टक्के ते ७० टक्के प्रमाणे व्याजापोटी फिर्यादी व त्यांच्या पत्नीकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात बारा लाख वीस हजार रुपये घेतले होते. त्यानंतरही सावकार शाम सावंत याने त्यांच्याकडे आणखी ४ लाख रुपये मुद्दल असल्याचे सांगुन त्याबदल्यात फिर्यादी यांच्या पत्नीची मैत्रीणची राहींजवस्ती येथील गट नंबर ४७ मधील १ गुंठा जमीन साठेखत करुन घेतलेली आहे. व त्यावर ५लाख रुपये दिले असल्याच सांगून त्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान या जागेवर ताबा नको असेल तर साडेचार लाख रुपये दया अशी मागणी ते करीत आहेत. इतकी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांनी फिर्यादीचे पत्नीस “तु व तुझी मुलगी धंदयावर बस, व धंदा करुन मी दिलेले पैसे फेड” असे अश्लिल भाषेत बोलून तिचा विनयभंग केलेला आहे. तसेच फिर्यादीस “पोलीसांत माझेविरुध्द तक्रार केल्यास, तुला जीपला बांधुन तुझी लोणी गावात वरात काढतो” अशी धमकी दिलेली आहे.
या प्रकरणानंतर असह्य झालेने पवार व त्यांचे साथीदारांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर हे करत आहेत