मोठी बातमी ! विधानसभा निवडणुकीचे कामकाजाचे प्रशिक्षण घेण्यास मुख्याध्यापकाचा अंगाशी ; मुख्याध्यापिकेवर गुन्हाच दाखल ..!


पिंपरी : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध स्तरावर प्रशिक्षण दिले जात असते. त्याच संदर्भात एक बातमी समोर आली आहे. मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशिक्षणाबाबत दिलेले आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध राष्ट्रीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत घडला आहे.मंडळ अधिकारी लिंबराज सलगर (वय ५०, रा. मांजरी बुद्रुक) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्रशिक्षणाबाबत आदेश दिले होते. त्यांनी आदेश स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हा ही कारवाई करण्यात आली आहे. फौजदार मुल्ला पुढील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!