राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, कारण…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाविरोधात वक्तव्य करणं त्यांना भोवलं आहे. आव्हाडांवरील एफआयआरमध्ये चार वेगवेगळ्या कलमांचा समावेश आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विरोधात ठाण्यामधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये चार वेगवेगळ्या कलमांचा समावेश आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगर या ठिकाणी एका कार्यक्रमात सिंधी समाजाला उद्देशून एक विधान केले होते . हे विधान सिंधी समाजाचा अपमान करणारे असल्याचं सांगत संधी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
सिंधी समाजाच्या भावना दुखावणारं विधान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यातील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये त्यांच्यावर भादंवि कलम १५३ अ, १५३ ब, २९५ अ आणि २९८ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.