महिलांची छेडछाड प्रकरणी पुण्यात ‘झेप्टो’ कंपनीच्या मॅनेजरसह पाच डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल


पुणे : पुण्यात महिलांच्या छेडछाड प्रकरणी “झेप्टो” कंपनीच्या मॅनेजरसह पाच डिलिव्हरी बॉय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयात ये-जा करणाऱ्या महिलांची छेडाछाड काढल्याप्रकरणी झेप्टो कंपनीचे

सूरज गायकवाड, स्टोअर मॅनेजर मोईन हन्नुरे आणि इतर अनोळखी चार ते पाच डिलिव्हरी बॉय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

मिळालेल्यामाहिती नुसार, पुण्यातील विमाननगरमधल्या लालवानी प्लाझा इथे विविध कंपन्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये सुमारे १५० महिला काम करतात.

झेप्टोचे गोडाऊन आणि कार्यालय तळमजल्यावर असल्याने, डिलिव्हरी बॉईज जमतात आणि महिलांना पाहून गैरवर्तन करतात, मग त्यांचं वय कितीही असो. शहरात किराणा आणि भाजीपाला वितरण सेवा पुरवणाऱ्या झेप्टोच्या गोदामातून डिलिव्हरी बॉय सामान घेण्यासाठी येतात.

इथल्या कार्यालयात कामासाठी येणाऱ्या महिलाच नव्हे, तर या याच आवारातील निवासी इमारतीतील महिलांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.

महिला काम करत असलेल्या ऑफिसच्या इमारतीच्या खाली झेपटो कंपनीचे गोदाम आहे. त्याठिकाणी तक्रारदार आणि त्यांच्या सहकारी महिलांसोबत कामावर येत-जात असताना, झेप्टो कंपनीचे मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजर तसंच डिलिव्हरी बॉय त्यांची छेड काढत होते.

इथे काम करणाने सर्व जण फिर्यादी महिलेसह इतर महिलाबाबत अश्लील भाषेचा वापर करत असत.तसेच घरापर्यंत पाठलाग करुन जाणीवपूर्वक महिलांसमोर कपडे बदलत असत. हा सगळा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरु असल्याची माहिती आहे.

दरम्यान या प्रकरणावर झेप्टोने आपली बाजू मांडली आहे. झेप्टोसाठी सुरक्षितता आणि सुरक्षा ही प्राथमिकता आहे. आम्ही सर्व डिलिव्हरी बॉईज आणि स्टाफ कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी कठोरपणे पडताळतो आणि त्यांना प्रशिक्षण देतो. या बाबीकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. स्थानिक यंत्रणेसोबत आम्ही या घटनेचा सखोल तपास करत आहोत, असं झेप्टोने म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!