‘या’ महिन्यात इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात येणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. ऑगस्ट महिन्यात इथेनॉल वर धावणारी गाडी बाजारात आणणार, चारचाकी व दुचाकी वाहने बाजारात येणार, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. भाजपने आज मुंबईत गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. मोदी सरकारच्या ९ वर्षपुर्ती निमित्ताने चर्चेचं आयोजन करण्यात आले होते.

या चर्चेला नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली.

गडकरी म्हणाले, ऑगस्टमध्ये टोयोटा गाडी लाँच करणार आहे. ही गाडी १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणार पेट्रोलच्या तुलनेत अवघ्या १५ रुपयांत लीटर इंधन उपलब्ध होईल. प्रदूषण शून्य असणार आहे. स्कूटर व चारचाकी गाड्या देखील बाजारात येणार आहे.

नितीन गडकरी म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेत ३७ करोड लोकांना फायदा झाला. पीएम किसान योजनेच्या ९.६ लोकांना गॅस कनेक्शन मिळाले. जनधन योजनेत ४९ करोड बँक अकाऊंट ओपन झाले. सर्वात गरीब नागरिकाला सन्मानाने उभे करण्याचा या योजनेचे उद्देश आहे. प्रधानंत्री आवास योजनेअंतर्गत तीन ते साडेतीन करोड लोकांना घरे देण्यात आली. योजनांची आणि लाभार्थी याची लिस्ट फार मोठी आहे.

आर्थिक निती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदल केला. विकासकाम होत आहेत कारण आर्थिक नितीमध्ये बदल होत आहेत. ९ वर्षात ५० लाख कोटींची काम आपण केली एकाही कामात भ्रष्टाचार झाला नाही, कोणाचा आरोप नाही, पारदर्शक कारभार केला हे का झाल तर आमच्या सरकारने सर्व डिजिटल केल. यामुळे पारदर्शकपणा आला आणि भ्रष्टाचार झाला नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!