उरुळीकांचन परिसरात घरगुती गॅसच्या विक्रीत मोठी चोरी! वितरणात मोठ्या प्रमाणात छेडछाड; घरगुती गॅस वजनाच्या असंख्य तक्रारी…


जयदीप जाधव                                             उरुळीकांचन : उरुळीकांचन परिसरात सरकारी कंपन्यांचा घरघुती गॅस पुरवठा असणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत, इंडेन या वितरणातून घरघुती गॅस पुरवठ्यात मोठी तफावत असल्याच्या असंख्य तक्रारी ग्राहकांकडून होत आहे. गॅस वजनात तफावत असल्याचा व स्वय़ंपाकात गृहीनींच्या नियोजनापूर्वी गॅस संपत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून सर्रासबाजार होणारा खुलेआम गॅसचा काळाबाजार तसेच गॅस सिलेंडर वितरणात छेडछाड करुन लिकेज करुन गॅस चोरी करुन चोरी करण्याचा प्रकारामुळे गॅस पुरवठ्यावर छेडछाड करुन गॅस चोरीचा गंभीर प्रकार रासरोसपणे सुरू असल्याची चर्चा आहे.

 

उरुळीकांचन परिसरात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत व इंडेन कंपनीचे पंधरा हजाराहून अधिक ग्राहक आहेत मात्र घरघुती स्वयंपाकाच्या गॅस मध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असल्याचा ग्राहक तक्रारी करीत आहेत. स्वयंपकाच्या गॅस मध्ये गृहीनींच्या नियोजनात घरघुती सिलेंडर कुटूंब नियोजनात गॅस लवकरच संपत असल्याचा तक्रारी आहे. या तक्रारींना परिसरात खुलेआम पध्दतीने होणारा गॅसचा काळाबाजार, गॅस रिफिलींगची छेडछाड व हॉटेलव्यवसायांकडून सर्रास वापरला जाणारा घरगुती वापराचा सिलेंडर यामुळे परिसरात एजन्सीकडून गॅस पुरवठा वितरणात गॅसची गळती करुन चोरी करत असल्याची चर्चा आहे.

 

उरुळीकांचन परिसरात गॅस एजन्सीकडून गॅस चे वितरण करताना ठराविक काळात गॅस पाईप लावून काढून रिकाम्या गॅस सिलेंडर मधून भरुन गॅस विकला जात असल्याची तक्रार आहे. या विक्रीत सर्रास गॅसचे काळाबाजार करणारे टोळके यात सामील असून सर्रासपणे गॅसची वाहतुक करुन सिलेंडर पुरविले जात आहे. या काळेबाजारात गॅस एजन्सीकडून थेट सिलेंडरला पाय फुटत असल्याचा तक्रारी आहेत. या चोरीच्या प्रकारामुळे घरघुती गॅस ग्राहकांची फसवणूक तर नागरीकांच्या सुरक्षितेचा मुद्दाही चव्हाट्यावर आला आहे. या चोरीच्या प्रकारामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नकारता येत नसल्याची शक्यता आहे.

एजन्सीचा पुरवठ्याची चौकशी व्हावी…

उरुळीकांचन परिसरात गॅस चोरी व काळाबाजाराची सर्रास विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. एजन्सीकडून हॉटेल व्यावसायिकांना मिळणारा गॅस व रिफिलींगमध्ये छेडछाडीमुळे गॅस पुरवठ्यात गॅस काढला जात असल्याची शंका आहे. गॅसचा काळाबाजार पाहता एजन्सी मालकांचे हात गुंतले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या एजन्सीचा पुरवठ्याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

ग्राहकांनी सावध राहणे आवश्यक…

घरघुती गॅस सिलेंडर पुरवठा होणाऱ्या सिलेंडर डिलेव्हरी वेळी गॅस सिलेंडरचे एजन्सीकडून असणारे सिलेंडरच्या १६ किलो वजन सोडून १४ किलो २०० ग्रॅम असणे आवश्यक आहे. या वजनात १०० ग्रॅम कमी व अधिक पणा असणे शक्य असले तरी त्यापेक्षा अधिक कमी वजनाचा गॅस सिलेंडर असेल तर तो ग्राहकाने तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच गॅस रिफिलींगमध्ये सदोषता तपासणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!