मोठी बातमी! महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय..


मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता आज वितरित केला जाणार आहे. सरकारने प्रती क्विंटल साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आज ३ लाख शेतकऱ्यांना जवळपास ४६५ कोटींचे सानुग्रह अनुदान वितरित होणार आहे. काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले..

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव

मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात
आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज
केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकारी निघून गेल्यानंतर सर्व मंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्राचा अहवाल पुढच्या आठ दिवसात येणार असल्याचं निश्चित झालंय. तसचे याबाबतची पुढची बैठक आता मराठवाड्यात होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!