शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात ८ रुपयांची घसरण, पशुखाद्याच्या दरात मात्र मोठी वाढ


पुणे : शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा धंदा करणे अवघड झाले आहे. आता दूधदरात मोठी घसरण झाली असून 38 वरून हे दर 32 वर आले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत गेला आहे.

असे असले तरी पशुखाद्याच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

दरम्यान, जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण जास्त असून आता या पशुपालकांकडे उपलब्ध असणारा चारा संपला आहे. अशातच पावसानेही दडी मारली असून पशुखाद्यात दरवाढ झाली आहे.

त्यामुळे पशुपालकांवर दुहेरी संकट आले आहे. यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर वाढले होते.

त्यामुळे पशुपालक दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होते, मात्र आता ते अडचणीत आले आहेत. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!