लाडक्या बहिणींच्या खात्यात खडखडाट ; ‘या’ दिवशी बँक खातं होणार फुल, मिळणार किती रुपये?


पुणे : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेला लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी जमा होणार याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे.अशातच आता राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा थकित हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ज्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर,डिसेंबर,जानेवारी या तीन महिन्याचे पैसे मिळाले नाहीत.त्यांना एकत्रित हफ्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकदम 4500 रुपये जमा होणार आहेत. अर्जांची छाननी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच फेब्रुवारी महिन्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

तसेच ज्या महिलांना आधीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत, त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.ही माहिती महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या अपडेटनुसार आहे. ई-केवायसी आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे जमा होतील. योजनेच्या अधिकृत पोर्टलवर स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती आणि त्याचा मोठा राजकीय फायदा महायुती सरकारला मिळाल्याचे दिसून आले. सध्या लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांना या महिन्यात एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!