पुणे हादरलं! शाळेतच १२ वर्षीय मुलाकडून ७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार..
पुणे : पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका शाळेत ७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदाशिव पेठेतील तरुणाने तरुणीवर हल्ला का केला?, अंगावर काटा आणणारी धक्कादायक माहिती आली समोर
या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली.मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर बुधवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यात चाललंय तरी काय! लग्नाला नकार दिला म्हणून महिलेने
अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केलेल्या पुणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती.
एमपीएससी पास दर्शना पवार हिच्या हत्येनंतर आता प्रशासनाचा मोठा निर्णय, आता किल्ल्यावर..
दरम्यान, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. आता या१२ वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप असून त्याला बाल न्याय मंडळाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. तसेच हे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीसमोर मांडण्यात आलं आहे.