पुण्यात २५ वर्षीय तरुणाला संपवलं, कोयता काढला अन्…,’मुळशी पॅटर्न’ स्टाइल हत्येनं खळबळ


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

एका पानटपरीवर किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर एका २५ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना कात्रजमधील साई सिद्धी चौकात घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरे याला अटक केली आहे.

आर्यन साळवे (वय. २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. धैर्यशील मोरे (वय. ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

मिळालेल्या माहिती नुसार, ११ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आर्यन पानटपरीवर पान खाण्यासाठी गेला होता. तिथे धैर्यशील सिगारेट ओढत उभा होता. धैर्यशीलने आर्यनकडे ‘खोडसाळ नजरेने’ पाहिल्याचा आरोप करत दोघांमध्ये वाद झाला.

रागाच्या भरात धैर्यशीलने कोयत्याने आर्यनवर वार केले. आर्यनने हात पुढे करून बचाव करण्याचा प्रयत्न केला. यात त्याची बोटे तुटली. डोक्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे म्हणाले, हा खून अचानक झालेल्या किरकोळ वादातून झाला आहे. यामागे काही पूर्ववैमनस्य होतं का, याचा तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!