स्त्री सुखाच्या वासनेपोटी २० वर्षीय तरुणीचा नराधमाकडून निर्घृण खून! डोक्यात तीन वेळा दगडाचा घाव; उरुळीकांचन पोलिसांकडून खूनाचा अखेर उलगडा….


उरुळी कांचन : स्त्री सुखाच्या विकृत माणसिकेतेपोटी २० वर्षीय तरुणीचा शरीर सुखाची मागणी करीत करीत असताना, तरुणीने नकार देताच चिडलेल्या नराधमाने मुलीच्या डोक्यात तीन वेळा दगडी घालीत तरुणीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार अखेर उरुळीकांचन पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कोरेगावमूळ (ता. हवेली ) निर्जनस्थळी नराधमाने केलेल्या कृत्याचा पोलिसांनी आरोपीने घातलेल्या बुटाच्या शोध घेऊन खूनाचा उलगडा केला आहे.

दिनेश संजय पाटोळे (रा. गोळेवस्ती, उरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर पुनम विनोद ठाकूर (वय २० वर्षे , रा. गगणआकांक्षा सोसायटी कोरेगाव मुळ, ता. हवेली जि पुणे) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकणी मनिष विनोद ठाकूर( वय २३ वर्षे ) रा. गगण आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, ता. हवेली जि पुणे) यांनी तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन कोरेगामूळ ग्रामपंचायत हद्दीत प्रयागधाम रस्त्यावर (दि.१४ )रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खाजगी नोकरीवरुन घरी परतणाऱ्या पुनमला पीएमपीएमएल बस मधून उतरताच निर्जनस्थळ पाहून आरोपी दिनेश पाटोळेने गाठून तिला शरीर सुखाची मागणी केली. मात्र पुनमने आरडाओरडा केल्याने भयभीत झालेल्या आरोपी दिनेश पाटोळेने पुनमवर तीन वेळा डोक्यात दगड घालून या प्रसंगाची वाच्यता होऊ
नये म्हणून खून केला.

पोलिसांनी खूनाच्या प्रकारानंतर सीसीटीव्ही फुटेज तसेच दूरध्वनी संवादावरुन खूनाचा तपास होण्यासाठी कसून तपास केला. मात्र काळोख्याचा फायदा व दुचाकी मोटरसायकल दुसऱ्या दिशेने उभी करुन आरोपीने खूनाचा संशय उत्पन्न होऊ नये म्हणून शिताफीने खून केला होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचे बुटाचे नमुने तपासून केलेल्या तपास कार्यात तपास पथकांनी घटनास्थळापासून ये -जा जाणाऱ्या रोडवरील सुमारे ६० -७० सीसीटीव्ही कॅमेरे, मयत मुलीच्या संपर्कातील तसेच परिसरातील सुमारे २०० ते २५० व्यक्तींकडे तपास केला व बुटाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आहे.

दरम्यान, पोलिसांनी नराधम दिनेश पाटोळे याला प्रथमवर्ग न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने सोमवार (दि. २७) पर्यंत पोलीस कोठडी कोठडी सुणावली आहे.

दरम्यान पोलिस तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, ईश्वर जाधव, गुन्हे शाखेचे अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, राजु मोमीण, अतुल डेरे, धिरज जाधव, भारत मोहोळ, रमेश भोसले, सुनील सस्ते, अजित काळे, कमलेश होले, विशाल रासकर, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, प्रविण चौधर, निलेश जाधव, सचिन जगताप, हरिश शितोळे, सुजाता भुजबळ, सावित्रा सांगडे, सुमित वाघ, दिपक यादव, सोमनाथ सुपेकर, सुवर्णा गायकवाड, ऋषीकेश रासकर, अश्वजीत मोहोड, अमोल खांडेकर, अमोल राउत, राजकुमार भिसे यांनी केली असून पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!