हडपसर येथे डान्स क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी क्लासचालकाला ठोकल्या बेड्या, आईने केला पाठलाग आणि लॉजवर…


हडपसर : येथील काळेपडळ स्वरुपम डान्स ॲकडमीचा चालक सुशिल कदम याला क्लासमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुलीच्या आईनेच दिवे गावच्या हद्दीतील एका लॉजवर कदम व तिच्या मुलीला पकडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

डान्स क्लासमध्ये डान्स शिकण्यासाठी आलेल्या पंधरा वर्षीय मुलीला फसवुन हडपसर-सासवड मार्गावरील एका लॉजवर नेऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

डान्स ॲकडमीचा चालक सुशिल राजेंद्र कदम (वय-३२, रा. गोपाळपट्टी, यशोप्रभा सोसायटी शेजारी, मांजरी बुद्रुक) हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

सुशिल कदम हा गुरुवारी दुपारी चार वाजनेच्या सुमारास त्याच्याच डान्स क्लासमधील एका मुलीला फसवुन हडपसर-सासवड मार्गावरील दिवे गावच्या एका लॉजवर घेऊन गेला होता.

ही बाब लक्षात आल्याने मुलीच्या आईने सुशिल कदम व अल्पवयीन मुलीला थेट लॉजवर जाऊन पकडल्याने, वरील प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याने हडपसर सुशिल कदम याच्या विरोधात पोक्सो कायदद्या अंतर्गत लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

सुशिल कदम हा ३२ वर्षीय तरुण हडपसर परीसरातील काळेपडळ येथे मागील कांही वर्षापासुन स्वरुपम डान्स अॅकडमी नावाचा डान्स क्लास चालवतो. याच क्लासमध्ये वरील पंधरा वर्षीय पिडीत मुलगी डान्स शिकण्यासाठी येत होती.

सुशिल कदम याने तिला लॉजवर नेले. व त्या ठिकाणी तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान मुलगी वेळेत घरी का आली नाही याचा शोध ध्त असतांना, मुलीच्या आईला सुशिल कदम बद्दल संशय आला.

यातुन सुशिल कदमचा ठावठिकाणा शोधण्यासाठी मुलीच्या आईने थेट हडपसर-सासवड मार्गावरील कदम व मुलगी असलेले लॉजच शोधुन काढले. दरम्यान, सुशिल कदम व मुलगी लॉजवर पकडले.

सुरुवातीला गयावया करणाऱ्या सुशिल कदम या नराधमाने मुलीला व तिच्या आईला दमबाजी करण्याचा प्रयत्न सुरु केला. याची माहिती सासवड पोलिसांना मिळताच, सासवडचे पोलिस घटनास्थळी पोचले. सासवड पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!