राज्य हादरलं! सांगोल्यात पोलिस उपनिरीक्षकाचा निर्घृण खून, वॉकींगसाठी घराबाहेर पडले अन्…

सांगोला : सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवार (ता.३)रोजी सकाळी ६ च्या वासूद (ता. सांगोला) येथील केदारवाडी रोडवर उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सूरज विष्णू चंदनशिवे( वय. ४२ ) असे खून झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, सूरज चंदनशिवे हे बुधवारी ( ता.२) रात्री ११ वाजायच्या सुमारास वाॅकींग करण्यासाठी घराबाहेर पडले होते. बराच वेळ झाला तरी घर परत आले नाहीत म्हणून घरच्या लोकांनी त्यांच्या मोबाईवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता.
त्यानंतर घरच्या मंडळींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. आज सकाळी सूरज चंदनशिवे यांचा सांगोला- वासूद रस्त्याच्या लगत अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याचे समोर आले. या भयंकर घटनेने सांगोल्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही निर्घृण हत्या का झाली याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.