खडकवासला ते लोणीकाळभोर पर्यंत बंदिस्त कालव्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात; आमदार राहुल कुल यांची माहिती..
उरुळी कांचन : खडकवासला उजवा कालवा, डावा कालवा, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या आदींच्या सुधारणेसाठी अशियन बँकेच्या सहकार्याने राज्य शासन सुमारे १६०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार असल्याचे आश्वासन मागील अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिले होते, त्यानुसार खडकवासला कालवा ते फुरसुंगी लोणीकाळभोर पर्यंत २८ किमी बंद नळी कालव्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
या प्रकल्पाद्वारे सुमारे ३ टिमसी पाण्याची बचत होणार आहे त्याचा फायदा हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग, पुणे , (भीमा उपखोरे) चे कार्यकारी अभियंता योगेश सावंत यांचेकडून या प्रकल्पाच्या बृहत आराखड्याची माहिती जाणून घेतली व विविध सूचना केल्या आहेत.
Views:
[jp_post_view]