मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांचे हडपसर भागातील असणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाला जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेत कार्यालयाजवळ असणारी सायकल जळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रात्री या कार्यालयाला तिघांनी आग लावली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सुरक्षा रक्षकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
कार्यालयाला आग कशासाठी लावली? आग लावणारे व्यक्ती कोण? याचा तपास सध्या हडपसर पोलिसांकडून करण्यात येणार आहे. यामुळे मात्र आता वेगवेगळ्या प्रकारचे चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासूनच रोहित पवार यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. असे असताना आता ही घटना घडली आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
त्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा वाद अजूनच पेटणार आहे. याबाबत अजून रोहित पवार काही बोलले नाहीत.