यूपीएससीमध्ये नोकरीची संधी! लीगल ऑफिसरसह अनेक पदे भरली जाणार, इथे करा अर्ज…
पुणे : यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने भरती अधिसूचना जारी केली असून, या अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करता येऊ शकतो.
या भरती मोहिमेसाठी उमेदवार २७ जुलैपर्यंत अर्ज करू शकतील. या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला २५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
दरम्यान, या भरती मोहिमेद्वारे एकूण ७१ पदे भरली जाणार असून, यामध्ये विधी अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी आणि इतर पदांचा समावेश आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल ..
या पदांच्या भरतीसाठी चाचणी / मुलाखत आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
पात्रता काय असणार..
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून संबंधित क्षेत्रात पदवी / पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा आणि इतर विहित पात्रता आणि कामाचा अनुभव असावा.
अर्जसाठी शुल्क किती?
उमेदवारांना या भरती प्रक्रियेत अर्ज करताना २५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
वयोमर्यादा काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे.