पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणीने तीन महिन्यांतच संपवले जीवन, धक्कादायक माहिती आली समोर…!

औरंगाबाद : येथे तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका 21 वर्षीय तरुणीने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माहेरी घरी कोणी नसताना तरुणीने हे धक्कादायक पाऊल उचलले.

ही घटना सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अंजली रोहित आव्हाड (वय 21 वर्षे रा. बजाजनगर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी पळून जाऊन विवाह केला होता.
अंजलीचा प्रेमविवाह रोहित कारभारी आव्हाड या तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांत अंजलीचा पती आणि सासरकडील मंडळींत कुरबुरी सुरू झाल्या. यामुळे त्रास दिला जात असल्याने याची तक्रार देण्यासाठी अंजली एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आली होती.

तेव्हा पोलिसांनी समजावून सांगून पती रोहित यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले होते. त्यानंतर ती माहेरी गेली होती. सकाळी अंजलीची आई कंपनीत कामासाठी गेल्या होत्या.
यावेळी अंजली ही घरी एकटीच असल्याने तिच्या आईने कंपनीत गेल्यानंतर दुपारी अंजलीला अनेक वेळा फोन केला. मात्र अंजली फोन उचलला नाही. शेजारच्यांनी खिडकीतून डोकावून पहिले असता त्यांना अंजलीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत दिसला.