पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात, जाणून घ्या तुमच्या शहरातले नवीन दर…
मुंबई : देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन इंधनाची खरेदी करावी लागत आहे. महागाईचा भडका अगोदरच देशात उडाला असताना इंधनाच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर होत असतात. सरकारी तेल कंपन्यांकडून आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत.
मात्र, आजही आज सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. जाणून घेऊयात शहरातील आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती.
दिल्ली – पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
दरम्यान IOCL नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकण्यात येत आहे. या ठिकाणी एक लिटर पेट्रोलची किंमत ८४.१० रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ७९.७४ रुपये इतकी आहे.
तसेच राजस्थान येथील श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर ११३.३० रुपये प्रति लिटर, तसेच एक लिटर डिझेलचे दर ९८.०७ रुपये आहे.