ना थका हूॅं ना हारा हूॅं, रण में अटल तक खडा हूॅं मैं! शरद पवार पुन्हा पावसात भिजले अन्….
पुणे : राज्याचे राजकारण सध्या चांगलंच तापले आहे. अजित पवारांनी बंड करत पक्षावर दावा केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जातंय.
मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी साताऱ्यात कोसळत्या पावसात घेतलेली ती सभा खूप गाजली होती. शरद पवारांचं पावसात भीजत केलेलं ते भाषण ऐतिहासीक ठरलं
त्या एका सभेने राज्यातील सगळं सत्ताकारण बदलून टाकलं होतं. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार पुन्हा पावसात भिजले आहेत.
राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असताना शरद पवार पुन्हा एकदा अॅक्शन मोडवरती आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खादार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा पावसात भिजल्याचा फोटो शेअर केला आहे.
“भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं ना थका हूँ ना हारा हूँ रण में अटल तक खडा हूॅं मैं” असं कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो शेअर केला आहे.
भाग गए रणछोड़ सभी,
देख अभी तक खड़ा हूँ मैंना थका हूॅं ना हारा हूॅं
रण में अटल तक खडा हूॅं मैं pic.twitter.com/5mmGYWBm3o— Supriya Sule (@supriya_sule) July 8, 2023
अजित पवारांनी बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतर शरद पवारांनी मी न्यायालयीन लढाई लढणार नाही तर जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली.
शरद पवारांनी महाराष्ट्रात सर्व बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज शरद पवारांची बंडखोर आमदार छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात येवला येथे पहिली जाहीर सभा होत आहे.
या सभेला जात असताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे जागोजागी जंगी स्वागत केले. दरम्यान शरद पवार येवल्याच्या दिशेने जात असताना ते पावसात भिजल्याचे पाहायला मिळालं.
मागच्या वेळी शरद पवार जेव्हा पावसात भिजले होते तेव्हा त्याचा परिणाम राज्यातील राजकारणात पाहायला मिळाला होता. आता शरद पवार पुन्हा एकदा पक्ष उभारणीसाठी राज्य पिंजून काढताना पावसात भिजले आहेत. याचा राजकिय लढाईत काय परिणाम होतो हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.