मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट?, ‘त्या’ एका फोनमुळे उडाली खळबळ…

पुणे : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला हा धमकीचा फोन आला आहे.यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, एका कॉलरने गुरूवारी सकाळी १० वाजता पोलीस कंट्रोल रुमला फोन केला आणि २४ जून रोजी संध्याकाळी ६,३० वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या परिसरात बॉम्बस्फोट होणार आहेत.
एवढेच नाही तर कॉलरने पुढे असा देखील दावा केला आहे की, आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो.
धमकी देणाऱ्या या व्यक्तीने पुढे असे देखील सांगितले की, ‘पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणतोय. त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. जर दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा कॉल करणाऱ्याने केला आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांच्या मदतीने धमकीचा फोन करणाऱ्याला ३० वर्षीय आरोपीला अटक करून मुंबईत आणले आहे. दरम्यान, आरोपीने वेगवेगळी नावे सांगितली आहेत. त्याने पोलिसांना आपले खरे नाव सांगितलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केली आहे.