मोठी बातमी! राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक, धमकी देणारा सराईत गुन्हेगार..

कर्जत : भाजपाचे आमदार राम शिंदे यांना सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना आता धमकी देणाऱ्या युवकाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राम शिंदे यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या युवकाला नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केले आहे. याबाबत आता पोलिस तपास करत आहेत.
सागर सुभाष गवासणे (वय ३४) असे या युवकाचे नाव आहे. तो जामखेड तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

महिला सवलतीमध्ये एसटीचा घोळ, एकाच मार्गावर वेगवेगळे दर, महिलांमध्ये नाराजी..
ही घटना घडल्यानंतर नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून घटनेचा तपास करुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
वैष्णवांचे महावितरणकडून स्वागत; अल्पोपाहाराची सेवा
हा आरोपी मध्यप्रदेश येथे उज्जैन व इंदौर परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपीला उज्जैन परिसरातून ताब्यात घेतले. तसेच पुढील तपासासाठी जामखेड
पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
कात्रज डेअरीचा अध्यक्ष ठरला! अजितदादांची पसंती भगवान पासलकरांना..
या आरोपीविरोधात नगर आणि इतर काही जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.