का लांबला मंत्रिमंडळ विस्तार?, पाच मंत्री वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर भाजपचा दबाव?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे. यामुळे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने कोंडीत पकडण्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची सूचना भाजपने केल्याचे समजते. त्यामध्ये पाचही मंत्री शिंदे यांचे निकटचे सहकारी व कथित उठावाच्या वेळेस त्यांना उघड उघड साथ देणारे व पुढाकार घेणारे मंत्री आहेत.
यामुळे आता मंत्रिमंडळ यामुळेच लांबला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे आमदारांचे लक्ष लागले आहे.

यामुळे शिंदेंची मोठी कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये शिंदे गटातील आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलणारे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, राज्यभर प्रसिद्ध असलेले मंत्री संजय राठोड व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. मतदारसंघात नाराजी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी ही दोन कारणे सगळ्यात महत्त्वाची आहेत.