मुलांनो सावधान! बनावट नवरीने दीड वर्षात केले वीस मुलांशी लग्न, पुण्यातील मुलांचा समावेश

पुणे : जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दोन तरुण मुलांशी विवाह करून रोख रक्कम व दागिने घेऊन पसार होणाऱ्या बनावट नवरी मुलीसह सहा जणांच्या टोळीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली.


या बनावट नवरीने मागील दीड वर्षात पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील सुमारे वीस मुलांशी विवाह करून आर्थिक फसवणूक केल्याची कबुली प्राथमिक तपासात दिली असल्याची माहिती आहे.

तुकोबारायांच्या पालखीचे उद्या दोन वाजता पंढरीकडे प्रस्थान
बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक), बनावट मावशी मीरा बंसी विसलकर (वय ३९), तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, दोघेही रा. अंबुजा वाडी, इगतपुरी घोटी, जि. नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. नगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४ रा. कुरकुटेवाडी, बोटा), बाळू गुलाब सरवदे (वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावी आहेत. या आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमी युगुलांनी घेतला मोठा निर्णय, घटनेने देश हादरला..
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. ध्रुवे हे करत आहेत.
