मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालकडून चारही गुन्हांत जामीन मंजूर ; २१ महिन्यांनी बांदल कारागृहा बाहेर…!
शिक्रापूर : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेली २१ महिने न्यायालयीन कोठडीत असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाने त्यांच्यावर दाखल असलेल्या चारही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे बांदल यांचा कारागृहा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंगलदास बांदल यांच्यासह अटकेत असलेले सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
२६ एप्रिल २०२१ रोजी शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक चार गुन्हे त्यांच्यावर दाखल होते.
एकुण ४ गुन्हे बांदल यांच्याशी संबंधित दाखल होते. या प्रकरणाशी संदर्भात आज महत्त्वपूर्ण सुनावणी उच्च न्यायालयात झाली. त्यात बांदल यांचे सह त्यांचे सर्व अटक असलेल्या सहकाऱ्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे.
दरम्यान जामिन प्रक्रियेला पुढील ४ ते ५ दिवस लागतील नंतरच बांदल बाहेर येवू शकणार असल्याची माहिती त्यांची सदर केस चालविणारे वकील प्रतिनिधी अॅड अदित्य सासवडे यांनी दिली आहे. बांदल यांच्या कारागृहा बाहेर येण्याने शिरुर- हवेली राजकारणात मोठी धांदल घडणार असल्याचे बोलले जात आहे.