कोल्हापूर दंगलीबाबत अजित पवार यांचे गंभीर आरोप; म्हणाले, निवडणूका समोर ठेऊन राज्यात..

कोल्हापुर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, निवडणूका समोर ठेऊन राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा गंभीर आरोप अजित पवारांनी केलाय. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जी दंगल झाली आहे त्याला कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे. अशी मागणी देखील पवार यांनी केली आहे.
समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कोल्हापूरमध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.आता या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

