मोठी बातमी! उद्या सायंकाळ पर्यंत कोल्हापुरमध्ये इंटरनेट सेवा बंद


कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. उद्या सायंकाळ पर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहिती आहे

याप्रकणी आता नवीन माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

दरम्यान, समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूरमध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन देखील सुरु केलं आहे. या आंदोलनात दगडफेक करण्यात आली. या ठिकाणी पोलीस असल्याची माहिती असून पोलिसांनी सगळ्यांची चैकशी देखी सुरु केल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!