सकाळचा व्यायाम ठरला शेवटचा! पाटस दौंड रोडवर वाहनाच्या धडकेत व्यायाम करत असलेल्या तरुणाचा मृत्यू…


दौंड : पाटस दौंड अष्टविनायक रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पायी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या पती-पत्नीला धडक देऊन अपघात झाला आहे.यामध्ये पाटस येथील युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दुर्गेश अंकुश जगताप (वय ३५, रा.पाटस – बिरोबावाडी,ता.दौंड जिल्हा पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पहाटे साडे पाच वाजण्याच्या आसपास पाटस – दौंड अष्टविनायक रस्त्यावर बिरोबावाडीच्या हद्दीत ही अपघाताची घटना घडली.

ओडिसा रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर, इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल केल्याचा मिळाला पुरावा..

मिळालेल्या माहिती नुसार, दुर्गेश अंकुश जगताप व त्याची पत्नी स्वाती हे पहाटे पाटस – दौंड रस्त्यावर दौंड बाजूकडून पाटस दिशेला पायी व्यायाम करीत असताना दौंड बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने दुर्गेश जगताप याला पाठीमागून जोरदार धडक दिली.

मान्सूनचा मुहूर्त हुकला! २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मान्सूनचं होणार आगमन, काळजी वाढली..

दुर्गेश हा रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यांच्या पत्नी स्वाती या थोडक्यात बचावली असून किरकोळ जखमी झाल्या आहेत. मयत दुर्गेश याचा भाऊ योगेश अंकुश जगताप यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!